Join us  

WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला आनंदाची बातमी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 2:16 PM

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला आनंदाची बातमी मिळाली आहे. 18 जूनपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात WTC Final खेळवली जाणार आहे आणि तत्पूर्वी मिळालेल्या या बातमीमुळे विराटसह टीम इंडियाचाही उत्साह वाढला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत केनला त्याचं अव्वल स्थान गमवावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) त्याच्याकडून हे स्थान हिसकावून घेतलं. ( Australia batsman Steve Smith has reclaimed the No.1 position in the ICC Men’s Test Player Rankings for the first time since the Boxing Day Tests last year). केनला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळता आलं नव्हतं, त्याचा फटका त्याला सहन करावा लागला अन् त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. स्मिथ 891 गुणांसह अव्वल, तर केन 886 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी सरकला आहे. त्यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकले आहे. रिषभ पंत व रोहित शर्मा प्रत्येकी 747 गुणांसह अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांमध्ये आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा व आर अश्विन अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीकेन विल्यमसन