दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत अव्वल स्थानी कायम आहे. संघाच्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २-१ ने विजय मिळवणारा कर्णधार कोहली सोमवारी जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये ९२२ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचा केन विलियम्स (९१३) दुसºया तर चेतेश्वर पुजारा (८८१) तिसºया स्थानी आहे. संघाच्या मानांकनामध्ये भारत अव्वल, तर न्यूझीलंड दुसºया स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका (तिसºया), इंग्लंड (चौथ्या) आणि आॅस्ट्रेलिया (पाचव्या) हे संघ अव्वल पाचमध्ये सामील आहेत.
अव्वल १० गोलंदाजांमध्ये भारताचे रविचंद्रन अश्विन (सहाव्या स्थानी) आणि रवींद्र जडेजा (१० व्या स्थानी) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)वेगवान गोलंदाज अँडरसनला दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने (सध्या तिसºया स्थानी) नोव्हेंबर महिन्यात अव्वल स्थानावरून हटविले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने या स्थानावर हक्क प्रस्थापित केला आणि अँडरसन दुसºया स्थानी आहे.अँडरसन व कमिन्स यांच्यादरम्यान १६ मानांकन गुणांचे अंतर आहे. अँडरसनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीत हे अंतर कमी करण्याची संधी होती. मानांकनातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी या दोन गोलंदाजांदरम्यान १ ऑगस्टपासून सुरु होणाºया अॅशेस मालिकेत कडवी लढत अनुभवयाला मिळेल.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा सर्वोत्तम भारतीय आहे. तो वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर व बांगलादेशचा शाकिब-अल-हसन यांच्यानंतर तिसºया स्थानी आहे. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला बुधवारी आयर्लंडविरुद्ध होणाºया कसोटी सामन्यात गोलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थानाची संधी होती, पण दुखापतीमुळे तो खेळणार नाही.