- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
चॅम्पियन्स अडचणीच्या स्थितीचा संधीमध्ये फायदा घेतात. याची प्रचिती देताना भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला. मुंबईमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाने चुका सुधारताना मायदेशात आपले वर्चस्व कायम राखले. आॅस्ट्रेलियाविरुद्धचा हा मालिका विजय न्यूझीलंडच्या प्रदीर्घ दौऱ्यात फायदेशीर ठरेल.
न्यूझीलंडच्य वातावरणामध्ये भारतीय संघाला पुरेशी संधी मिळालेली नाही, हे खरे आहे, पण भारतीय संघ यापूर्वी अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरा गेलेला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फलंदाजांनी लय मिळवली, तर गोलंदाजांनीही आपले योगदान दिले. बुमराहच्या कामगिरीकडे डोळेझाक करता येणार नाही. बºयाच दिवसानंतर संघात परतलेल्या या गोलंदाजांना बळी घेता आले नसले तरी त्याची उपस्थिती प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यास निर्णायक ठरली. त्यामुळे दुसºया टोकाकडून गोलंदाजांना यश मिळत राहिले. मोहम्मद शमी रणनीतीनुसार वॉर्नरला स्वस्तात बाद करण्यात यशस्वी ठरला. युवा नवदीप सैनीने निर्णायक षटकांमध्ये यॉर्कर्सचा चांगला वापर केला. फिरकीपटूही छाप सोडण्यात यशस्वी ठरले. जडेजाने माफक गोलंदाजी करताना बळीही घेतले आणि कुलदीप यादवने धाडसी मारा करताना चेंडूला उंची दिली.
स्टीव्ह स्मिथची चमक अनुभवाला मिळाली. त्याला मार्नस लाबुशेनची चांगली साथ लाभली. पण, आॅस्ट्रेलियाची फलंदाजी आघाडीच्या तीन खेळाडूंवर विसंबून असल्याचे दिसून आले. भारताचे क्षेत्ररक्षण लक्षवेधी झाले. बेंगळुरूमध्ये विराट कोहलीने लाबुशेनचा टिपलेला झेल शानदार होता. स्मिथच्या शतकानंतरही आॅस्ट्रेलिया संघाला ३० धावा कमी पडल्या.
न्यूझीलंड दौºयापूर्वी भारतीय संघाला शिखर धवनच्या रुपाने मोठा धक्का बसला. भारतीय संघ या धक्क्यातून लवकरच सावरेल, अशी आशा आहे. ‘पांढºया चेंडू’च्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या रूपाने दोन दिग्गज आहेत. आॅस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत गोलंदाज छाप सोडतील, असा विचार करीत प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण, हेजलवूडचा अपवाद वगळता वेगवान गोलंदाज अपयशी ठरले.
अॅडम झम्पा व अॅश्टन एगरने परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, पण बळी घेता आले नाही. याचे सर्व श्रेय विराट-रोहित यांना जाते. दोघांना विशेष अनुभव नसलेल्या मधल्या फळीची कल्पना होती. मोठ्या व्यासपीठावर दोन्ही दिग्गजांचा खेळ बघण्यासारखा असतो. (गेमप्लॅन)
Web Title: Virat-Rohit will make an impression in New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.