ठळक मुद्देत्यांचे सगळेच चाहते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची वाट पाहत होते.शेवटी काल त्यांनी इटली येथे आपले लग्न गुपचुप पध्दतीने जवळच्या लोकांसोबत पार पाडले.सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या जोड्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे.
मुंबई : अखेर हो नाही , हो नाही करता करता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा लग्नसोहळा पार पडला. भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक अनुष्का हे सुंदर जोडपं अखेर विवाहबंधनात अडकलं. चार वर्षाच्या नात्यानंतर हे दोघे कधी लग्न करणार याचीच चर्चा सगळीकडे होती आणि ती आता थांबली आहे. आता सगळीकडे त्यांच्या लग्नसोहळ्याच्या चर्चा आहेत. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावं इतके सुंदर फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
खरंतर क्रीडाविश्व ते मनोरंजन विश्वातील साऱ्यांच्या नजरा या लग्न सोहळ्यावर लागलेल्या होत्या. सुरुवातीपासूनच विरुष्काने या लग्नसोहळ्याबाबत अतिशय गुप्तता पाळली होती. मात्र एवढ्या मोठ्या हस्तींबाबतचा विषय असल्याने या लग्नाच्या बातम्या कुठून ना कुठून बाहेर येतच होत्या. आपले कुटूंबिय, जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत या लग्नसोहळा इटलीमध्ये पार पडला.
आणखी वाचा - शुभमंगल सावधान! 'विरूष्का' अखेर विवाहबंधनात, विराट-अनुष्काने इटलीत घेतले सात फेरे
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमं या दोघांवर नजरा ठेऊन होती मात्र तरीही त्यांनी अतिशय गुप्तता पाळत आपला विवाह समारंभ आटपून घेतला. सब्यसाची मुखर्जी या प्रसिध्द डिझायनरच्या आऊटफिटमध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत होते. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करताच सर्वांनी त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. क्रिडाविश्वातील आणि मनोरंजन विश्वातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही या दोघांना तुम्ही एकत्र सुंदर दिसताय असं म्हणत वैवाहीक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय कसोटी क्रिकेटर व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांनीही त्या दोघांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या.
विराटचा सहकारी शिखर धवन यानेही ट्विट करुन या नवविवाहीत जोडीला शुभेच्छा दिल्यात.
सुरेश रैनानेही विराट कोहली आणि अनुष्का शर्माला नवविवाहीत आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच विवाहीतांच्या क्लबमध्ये विराटचं गंमतीनं स्वागत केलं.
आणखी वाचा - अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहली, सोबत क्रिकेट खेळायचे - अनुष्काच्या आजीने केला खुलासा
भारतीय संघातील गोलंदाज आर. अश्विननेही या दोघांना आपल्या ट्विटमधून शुभेच्छा दिल्या.
इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधून रितेश देशमुखने या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की आतापासून विराट कोहली उपकर्णधार असेल आणि नविन कर्णधार आहे अनुष्का शर्मा.
इतकंच नाही , हासुध्दा आणखी एक
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही आपल्या सहकलाकाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो की आता खरी रब ने बनाई जोडी वाटत आहे.
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांनीही त्यांच्या या 'पार्टनरशीप'साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आता कुठे या दोघांचा ल्गन झालं आहे तरीही सगळीकडे फक्त त्यांचीच चर्चा आहे. व्हॉट्सअॅप म्हणा, इन्स्टाग्राम म्हणा किंवा ट्विटर म्हणा सगळ्या सोशल मिडीयावर याच कार्यक्रमातील फोटो दिसताहेत. जणु काही ते ऑनलाईन आभासी जग विरुष्कामय झालं आहे. ट्विटरवरसुध्दा ##virushkaKiShadi हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. तसेच इतर सर्व मीडियांवर #VirushkaWedding आणि #ViratAnushkaWedding हे हॅशटॅग ट्रेंडींग आहेत
Web Title: #VirushkaWedding: Celebrities wish they'd like to get away from Virat and Anushka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.