Join us  

फक्त दोनच अर्धशतकं, तरीही ट्वेंटी-20 सामन्यात संघांनी मिळून चोपल्या 442 धावा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझन राष्ट्रीय कर्तव्यानंतर या लीगमध्ये पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 8:57 PM

Open in App

 

इंडियन प्रीमिअर लीगची ( आयपीएल) उत्सुकता असताना कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि व्हीटॅलिटी ब्लास्ट ट्वेंटी-20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी झालेल्या ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगमधील सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 442 धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझन राष्ट्रीय कर्तव्यानंतर या लीगमध्ये पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. त्यानंही दमदार खेळ केला. विशेष बाब म्हणजे एवढ्या धावा चोपूनही केवळ दोन फलंदाजांना अर्धशतक झळकावता आले.

सोमरसेट आणि वॉर्सेस्टरशायर यांच्यातला हा सामना झाला. सोमरसेटनं प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा यंदाच्या ट्वेंटी-20लीगमधील पहिलाच सामना होता. त्यात त्यानं तुफान फटकेबाजी केली. आझमनं 35 चेंडूंत 4 चौकार  व 1 षटकार खेचून 42 धावा केल्या. जेम्स हिलड्रेथ ( 26), टॉम अॅबेल ( 21) आणि व्हॅन डेर मर्वे ( 25*) यांनीही दमदार खेळ केला. पण, स्टीव्हन डेव्हीसनं 35 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार मारताना 60 धावांची खेळी करून संघाला 8 बाद 229 धावांचा डोंगर उभा करून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना वॉर्सेस्टरशायरची सुरूवात निराशाजनक झाली. पण, जॅक लिबीनं 46 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 75 धावा केल्या. तीन विकेट्स घेणाऱ्या डॅरी मिचेलनं फलंदाजीतही कमाल दाखवली. त्यानं 22 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 45 धावा केल्या. पण, वॉर्सेस्टरशायरला विजयासाठी 16 धावा कमी पडल्या. 20 षटकांत त्यांना 7 बाद 213 धावा करता आल्या.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी 

IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय 

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत

टॅग्स :टी-20 क्रिकेटपाकिस्तान