Join us  

माझ्यावरील टीकेचा बदला घेण्यासाठी वॉर्नरने चेंडू कुरतडण्याचा कट आखला - कॅन्डिस वॉर्नर

ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशा मावळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा अश्रूंना बांध फुटला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 3:53 PM

Open in App

सिडनी : चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर अस्वस्थ झालेल्या डेव्हिड वॉर्नरने शनिवारी पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशा मावळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा अश्रूंना बांध फुटला होता. या प्रकरणात आता आणखी एक नवीन खुलासा समोर आला आहे.  दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या सामन्यामध्ये झालेली चेंडूशी झालेली छेडछाडची घटना माझ्यामुळं झाल्याचा धक्कादायक खुलासा डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डिस वॉर्नरने केला आहे.  दक्षिण आफ्रिकेत माझ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेचा बदला घेण्यासाठी पती डेव्हिड वॉर्नरने हे पाऊल उचललं, असं कॅन्डिसने माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान, कॅन्डिस वॉर्नरची थट्टा करण्यात आली होती. तीन चाहत्यांनी कॅन्डिसची खिल्ली उडवण्यासाठी रग्बी खेळाडू सोनी बिल विल्यम्सचे मुखवटे घातले होते. त्यांच्यासोबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे दोन वरिष्ठ खेळाडूही उपस्थित होते. वॉर्नरशी लग्न करण्यापूर्वी 2007 साली कॅन्डिस आणि सोनी बिल विल्यम्स यांचा पुरुषांच्या बाथरुममधील फोटो व्हायरल झाला होता.

चेंडूंशी छेडछाड म्हणजे काय?अवैधपणे चेंडूवर प्रयोग केले तर ती छेडछाड ठरते. यामध्ये काही वेळा चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूवर छोटेखानी खड्डे केले जातात, जेणेकरून  खेळाडूला चांगली ग्रीप मिळू शकते. चेंडूच्या शिलाईवर काही प्रयोग केले जातात. काहीवेळा चेंडूची शिलाई ढीलीही केला जाते. त्याचबरोबर चेंडूचा पृष्ठभाग बदलण्याचा प्रयत्न केला जातो.

चेंडूशी छेडछाड कशी केली जाते?बऱ्याच वर्षांपूर्वी चेंडूला ग्रीस लावून त्याचा पृष्ठभाग बदलला जायचा. काही वर्षांनी ग्रीसचा वापर बंद झाला, त्यानंतर जेली बिन्स याप्रकारासाठी वापरल्या जाऊ लगाल्या. चेंडूच्या शिलाईबरोबर काही जणांनी आपल्या नखांनी किंवा टणक वस्तूने छेडछाड करायचा बऱ्याचदा प्रयत्न केला आहे. धातूच्या वस्तूने किंवा टेपच्या माध्यमातून चेंडूचा पृष्ठभाग किंवा आकार बदलल्याचे काही प्रकार घडले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी कायकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.

टॅग्स :चेंडूशी छेडछाड