तुम्ही, बिर्यानी खाऊन वर्ल्ड कप जिंकणार का? पाक संघावर अक्रमचा संताप

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वच संघ जोमाने तयारीला लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:39 AM2019-04-09T11:39:35+5:302019-04-09T11:40:03+5:30

whatsapp join usJoin us
Wasim Akram accuses Pakistani players of eating biriyani ahead of World Cup | तुम्ही, बिर्यानी खाऊन वर्ल्ड कप जिंकणार का? पाक संघावर अक्रमचा संताप

तुम्ही, बिर्यानी खाऊन वर्ल्ड कप जिंकणार का? पाक संघावर अक्रमचा संताप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लाहोर, वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वच संघ जोमाने तयारीला लागले आहेत. वर्ल्ड कपच्या जेतेपदाच्या शर्यतीत भारत आणि इंग्लंड हे संघ आघाडीवर आहेत, परंतु न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याकडू दुर्लक्ष करून चालणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सर्वच संघांतील खेळाडूंना दुखापतीपासून दूर राहण्याचं आव्हान पेलावं लागत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती हा नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना या समस्येने भेडसावले आहे. 

पाकिस्तान संघाचा माजी महान गोलंदाज आणि 1992 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य वसीम अक्रम याने पाक खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला आहे. संघ व्यवस्थापनावर टीका करताना अक्रम म्हणाला,''पाकिस्तानच्या खेळाडूंना बिर्यानी दिली जात आहे. त्यांच्या डाएट प्लानमध्ये बिर्यानीचा समावेश कसा करण्यात आला. आता हे खेळाडू बिर्याना खाऊन वर्ल्ड कप जिंकणार आहेत का?''



संयुक्त अरब अमिराती येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत पाकिस्तान संघाला 5-0 असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेनंतर पाक प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला होता.  

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, करणार का 2017ची पुनरावृत्ती?
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंडने सर्वात आधी आपला संघ जाहीर केला. त्यापाठोपोठ शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( पीसीबी) वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे संभाव्य 23 खेळाडूंची नावांची घोषणा केली आहे. हे खेळाडू 15 आणि 16 एप्रिलला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरूस्तीची चाचणी देणार आहेत आणि त्यानंतर 18 एप्रिलला अंतिम संघ जाहीर करण्यात येईल. 

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने 
24 मे  - वि. अफगाणिस्तान ( सराव सामना) 
26 मे  - वि. बांगलादेश ( सराव सामना) 
31 मे - वि. वेस्ट इंडिज, ट्रेंट ब्रिज
3 जून -  वि. इंग्लंड, ट्रेंट ब्रिज
7 जून - वि. श्रीलंका, ब्रिस्टोल
12 जून - वि. ऑस्ट्रेलिया, टाँटन
16 जून - वि. भारत, ओल्ड ट्रेफर्ड  
23 जून - वि. दक्षिण आफ्रिका, लॉर्ड्स
26 जून - वि. न्यूझीलंड, एडबॅस्टन
29 जून - वि. अफगाणिस्तान, हेडिंग्ले
5 जुलै -  वि. बांगलादेश, लॉर्ड्स
 

Web Title: Wasim Akram accuses Pakistani players of eating biriyani ahead of World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.