ठळक मुद्देसर्व प्रकारच्या क्रिकेटमधून वसिम जाफर निवृत्त३१ कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्वप्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत जाफरच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक सामने आणि धावांचा विक्रम नावावर असलेल्या वासिम जाफरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जाफरने ३१ कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर ३४.१० च्या सरासरीने १९४४ धावा जमा आहेत. दोन वन डे सामन्यांतही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत त्याच्या नावावर सर्वाधिक १९४१० धावा केल्या आहेत आणि यापैकी १२०३८ धावा या रणजी करंडक स्पर्धेतील आहेत.
तो म्हणाला," वयाच्या १६ व्या वर्षांपासून २०१४ पर्यंत मी ४१ वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व मी केले. संजय मांजरेकर हे माझे पहिले कर्णधार. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, झहीर खान, अमोल मुझुमदार आणि निलेश कुलकर्णी या दिग्गज खेळाडूंसोबत मुंबई संघाचे ड्रेसिंग रुम शेअर करण्याचे भाग्य मला लाभले."
Web Title: Wasim Jaffer Announces Retirement From All Forms of cricket svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.