वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यष्टिमागील कौशल्यामुळे चांगला चर्चेत राहिला. धोनीच्या बॅटीतून धावा आटल्या असल्या तरी यष्टिमागील त्याच्या चपळतेला तोड नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने अशक्य वाटणारे काम करून दाखवले. त्याशिवाय भारतीय गोलदाजांना त्याने केलेले मार्गदर्शन संघाच्या फायद्याचेही ठरले. त्याचे हे मार्गदर्शन स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाल्याने सर्वांच्या ऐकण्यात आले. असाच एक मजेशीर किस्सा समोर आला आहे आणि त्यात कॅप्टन कूल धोनी गोलंदाज युजवेंद्र चहलची 'फिरकी' घेत असल्याचे समोर येत आहे. धोनीच्या या विनोदावर कुलदीप यादवलाही हसू आवरणे कठीण झाले.
पाचव्या वन डे सामन्यात धोनीनं मराठमोळ्या केदार जाधवला मराठीतून मार्गदर्शन केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. भाऊ... घेऊन टाक... असे धोनीनं जाधवला सांगितले होती. संघातील खेळाडूंना नेहमी उत्साही ठेवणे आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची खुबी धोनी जाणून आहे. त्यामुळेच प्रसंग कसाही असो धोनी कूलच राहतो आणि संघातील खेळाडूंनाही दडपणापासून दूर ठेवतो.
पाचव्या वन डे सामन्यात न्यूझीलंडचा जिमी निशॅम फलंदाजी करत असताना चहल गोलंजाजीसाठी आला आणि त्याने क्षेत्ररक्षणात बदल केले. त्या सामन्यात कुलदीप बदली खेळाडू म्हणून आलेला आणि चहलचे हे कृत्य पाहून धोनीनं कुलदीपकडे बघत एक जोक हाणला... त्याच्या या विनोदावर कुलदीपला हसू आवरले नाही. धोनी म्हणाला,''फेकने दे इसको. मुरलीधनरनसे ज्यादा फिल्डींग मे इसको फरक पडता है! ( त्याला गोलंदाजी करू दे. मुरलीधरणपेक्षा क्षेत्ररक्षणातील बदलाचा त्याला अधिक फरक पडतो.)"
पाहा व्हिडीओ...
निराशाजनक सुरुवातीनंतर भारतीय संघाने अंबाती रायुडूच्या 90 धावांच्या जोरावर 252 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडचा डाव 217 धावांत गुंडाळला.
Web Title: Watch: MS Dhoni trolls Yuzvendra Chahal for making field changes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.