नवी दिल्ली : प्रदूषणामुळे सलग तिसºया दिवशीही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना त्रास झाला. याबाबत बोलताना भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन म्हणाला, ‘आम्हाला या परिस्थितीमध्ये खेळण्याची सवय असावी, पण श्रीलंकेच्या खेळाडूंना याचा त्रास होत असेल.’ खेळाडूंचे काम खेळण्याचे असून त्यांनी यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असेही त्याने सांगितले.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रदूषणाबाबत बोलताना धवन म्हणाला,‘दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाल्यामुळे याची सवय झाली आहे. या महिन्यांमध्ये दुसºया राज्यातील पिकांची कापणी होते त्यावेळी असे वातावरण असते. उन्हही नसते. उन्ह जर पडले तर प्रदूषण कमी होते. प्रदूषण आहे, पण खेळणे थांबविण्यासारखे नक्कीच नाही. कदाचित श्रीलंकेच्या खेळाडूंना याची सवय नसावी. आमच्या संघातीलही अनेक खेळाडू दिल्लीतील नाहीत. त्यांना या परिस्थितीमध्ये खेळण्याची सवय नाही. खेळणे आमचे काम असून त्यापुढे दुसºया कुठल्या बाबीचा अडथळा नसतो, असे माझे मत आहे.’
श्रीलंकेच्या खेळाडूंबाबत सहानुभूती व्यक्त करताना धवन म्हणाला,‘कदाचित श्रीलंकेत येवढे प्रदूषण नसावे. तसे तेथे समुद्र किनारे अधिक आहे. समुद्र किनाºयावरच्या शहरांमध्ये तसेच प्रदूषण कमी असते. त्यामुळे त्यांना येथे जाणवत असावे. कदाचित अन्य मोसमामध्ये दिल्लीत लढत झाली असती तर परिस्थिती एवढी खराब नसती.’
धवन पुढे म्हणाला, ‘संघव्यवस्थापनाने आक्रमक फलंदाजी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार फलंदाजी केली. आम्ही बुधवारी, अखेरच्या दिवशी सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. श्रीलंकेचे तीन फलंदाज बाद झाले असून त्यांच्यावर दडपण राहील.’
लंकेच्या दुसºया डावात मोहम्मद शमीला त्रास झालेला पाहिले, पण तो फिट असल्याचे धवनने म्हटले. (वृत्तसंस्था)
Web Title: We should use this atmosphere, players should focus on the match - Shikhar Dhawan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.