नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी सांगितले की, महिला इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन करण्याची योजना आहे.’ महिला आयपीएलला चॅलेंजर सिरीज या नावाने ओळखले जाते. महिला आयपीएलला देखील या कार्यक्रमात जागा दिली जाणार आहे.पुरुष आयपीएलचे आयोजन सप्टेंबर आणि आॅक्टोबर दरम्यान केले जाणार आहे. यातच महिलांच्या स्पर्धा देखील घेतल्या जातील. रविवारी आयपीएल संचनल परिषदेच्या बैठकीत गांगुली याने सांगितले की, मी पुष्टी करतो की महिला आयपीएलचे आयोजन करण्याची योजना आहे. आणि राष्ट्रीय संघासाठीदेखील आमच्याकडे कार्यक्रम आहे.’
गांगुली यांनी महिला आयपीएलच्या कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. मात्र त्याच्याशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला चॅलेंजर सिरीजचे आयोजन गेल्या वर्षीप्रमाणेच आयपीएलच्या अखेरच्या सत्रात होईल. सूत्रांनी सांगितले की, ‘महिला चॅलेंजर सिरीजचे आयोजन १ ते १० नोव्हेंबरदरम्यान करण्याची योजना आहे, किंवा त्या आधी त्याचे शिबिर होऊ शकते.’ माजी भारतीय कर्णधाराने सांगितले की, ‘केंद्रीय करार मिळालेल्या महिला खेळाडूंसाठी एका शिबिराचे आयोजन होणार आहे. जे सध्या देशातील स्थिती पाहता टाळण्यात आले आहे. आम्ही क्रिकेटला आरोग्याच्या जोखमीत नक्कीच टाकणार नाही.’मिताली आणि सहकाऱ्यांनी केले स्वागतभारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजसह अन्य महिला क्रिकेटपटूंनी रविवारी भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. त्यात युएईमध्ये पुरूष इंडियन प्रीमीयर लीगच्या दरम्यान महिला आयपीएलचे देखील आयोजन होईल. मार्चमध्ये विश्व टी२० च्या अंतिम सामन्यानंतर महिला संघाने कोणताही सामना खेळलेला नाही. इंग्लंड दौरा रद्द झाल्यानंतर महिला संघाला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाºया एकदिवसीय विश्व चषकाच्या आधी क्रिकेट खेळण्याची संघी मिळणार नाही. पूनम यादव हिनेही गांगुली यांचे आभार मानले आहे.हिली, बेट्स यांनीव्यक्त केली नाराजीभारतीय खेळाडूंकडे आधीच डब्ल्यूबीबीएलचा करार आहे. एकाचवेळी दोन्ही स्पर्धा झाल्यावर त्या काय करतील, असा प्रश्न आॅस्ट्रेलियाची हिली हिने केला आहे. तर सुजी बेट्स, रशेल हेन्स यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.ही एक शानदार बातमी आहे. आमच्या एकदिवसीय विश्वचषक अभियानाला सुरुवात होईल. गांगुली, बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार, महिला क्रिकेटला समर्थन देणाºया बोरिया मुुजूमदार यांचेही धन्यवाद- मिताली राज