भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी हेजल किच यांनी Fathers Day चं औचित्य साधून बाळाचं बारसं केलं आहे. युवीनं सोशल मीडियावर बाळाचा फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ३० डिसेंबर २०१६ रोजी युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच यांचा विवाह झाला होता. हेजलनं यापूर्वी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. तसंच तिनं बिल्ला आणि बॉडिगार्डसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. परंतु लग्नानंतर हेजर चित्रपटसृष्टीत जास्त अॅक्टिव्ह दिसली नाही.
२५ जानेवारी २०२२ या दिवशी युवी व हेझल यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर ५ मे रोजी हेझलने मुलाचा फोटो पोस्ट केला होता, परंतु त्यात त्याने मुलाचा चेहरा लपवला होता. Star Wars चे स्टीकर त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि त्यावर "May the 4th be with you." असे लिहिलं होते. ८ मे रोजी युवीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि यात बाळ दिसत होते. ३ महिन्यांच्या मुलाची नॅपी बदलताना युवी यात दिसतोय. मातृदिनाचं औचित्य साधून युवीनं हा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण, आज या दोघांनी बाळाचा फोटो पोस्ट केला आहे.
युवराज सिंगची लक्षवेधी कामगिरी :
- २००७ मध्ये आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेतील सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम
- २००० ते २०१७ या कालावधीत २६ वन-डे सामन्यात सामनावीर
- २००५ ते २०११ या कालावधीत सातवेळा मालिकावीर
- २०१३-१७ या कालावधीत सात टी-२० सामन्यात सामनावीर
- २०१२ मध्ये भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
- २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव.
- २०११ विश्वकप स्पर्धेत स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी.