सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा फिनिशर आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारतीय संघानं अनेक सामने जिंकलेत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 05:13 PM2020-05-08T17:13:02+5:302020-05-08T17:13:52+5:30

whatsapp join usJoin us
what has MS Dhoni done for youngsters? Asks Yograj Singh svg | सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा फिनिशर आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारतीय संघानं अनेक सामने जिंकले. आपल्या शांत स्वभावामुळे धोनीला कॅप्टन कूल हे नाव पडलं. त्यानं भारतीय संघातील अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. पण, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. युवा खेळाडूंच्या खेळात सुधारणा होण्यासाठी धोनीनं काहीच केलं नसल्याची टीका योगराज यांनी केली. 

Salute: कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिसाच्या कुटुंबासाठी Gautam Gambhir चं मोठं पाऊल

सौरव गांगुलीचं उदाहरण देताना योगराज यांनी धोनीवर टीका केली. ते म्हणाले,''धोनी इतकी वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खेळत आहेत, मी त्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. त्यानं कोणत्या क्रिकेटपटूसाठी अस काय केलंय? सौरव गांगुलीनं स्वतःसह आपल्या देशाचा आणि संघाचा पहिला विचार केला. म्हणूनच भारतीय क्रिकेटमध्ये त्याला मानाचं स्थान आहे.''

प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे...; Virat Kohli नं मांडलं स्पष्ट मत

गेल्या 9-10 महिन्यांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. योगराज म्हणाले,''भारताने जगाला दिलेल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. त्यानं जे काही मिळवलं, ते त्याची महानता सांगण्यासाठी पुरेसं आहे. पक्षपातीपणा भारतात अजूनही कायम आहेच. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होईपर्यंत वरिष्ठांची बूट चाटली जातात. धोनीला आणखी खेळायचे की नाही, ते निवड समिती आणि बीसीसीआयवर अवलंबून आहे. त्याची इच्छा असेल, तर तो संघात नक्की पुनरागमन करेल. इच्छा नसेल, तर तो येणार नाही.''

महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहलीनं Yuvraj Singhचा विश्वासघात केला
युवराज सिंगनं नुकतंच एक विधान केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की,''सौरव गांगुली ज्या प्रकारे माझ्या पाठीशी उभा राहीला, तसा पाठिंबा मला विराट कोहली आणि धोनीकडून मिळाला नाही.'' या संदर्भात News24शी बोलताना योगराज यांनी धोनी व कोहलीवर टीका केली. ते म्हणाले,''धोनी आणि कोहलीसह निवड समितीनंही युवराजचा विश्वासघात केला. नुकतीच माझी रवी शास्त्रीसोबत भेट झाली. मी तेव्हा त्यांना सांगितले की प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीनुसार निरोप समारंभ दिला पाहिजे. धोनी, कोहली किंवा रोहित जेव्हा निवृत्त होतील, तेव्हा त्यांना सन्मानजक निवृत्ती द्या. भारतीय क्रिकेटसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे. युवराजला अनेकांनी फसवलं आणि ती खंत कायम राहील.''
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी

शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही

इंग्लंडच्या विश्वविक्रमी फलंदाजाचे निधन; आजही 'तो' विक्रम अबाधित

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...

Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन करण्यासाठी तयार 

 

Web Title: what has MS Dhoni done for youngsters? Asks Yograj Singh svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.