पाकिस्तानाचा माजी कर्णधार आणि मॅच विनर शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) नेहमी कोणत्याना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. १ मार्चला त्याचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आफ्रिदीनं एक ट्विट केलं. त्याच्या या ट्विटनं पुन्हा एकदा गोंधळ उडवला आणि सोशल मीडियावर आफ्रिदीचं नेमकं वय किती?, अशी चर्चा सुरू झाली आहे. नेटिझन्स आफ्रिदीला ट्रोल करत आहेत. आफ्रिदीनं ट्विटमध्ये त्याचं वय ४४ असं लिहिलं.
आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात त्याचं वय ४६ वर्ष असल्याचे लिहिले आहे आणि काही वेबसाईटवर त्याचं वय ४०-४१ असं दाखवलं जात आहे. वेगवेगळ्या वयामुळे आफ्रिदीला आता ट्रोल केलं जात आहे. शाहिद आफ्रिदीनं त्याच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातही वयाबाबत खुलासा केला आहे. कागदपत्रात दाखवण्यात आलेल्या वयापेक्षा त्याचं खरं वय अधिक आहे, असे त्यानं म्हटलं आहे. या दोन्ही तारखांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे. त्याच्या या खुलाशानंतर खूप वादही झाला. IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार
आता आफ्रिदीच्या या ट्विटवनं पुन्हा चर्चेला विषय मिळाला आहे. त्यानं ट्विट केलं की,''मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी आज ४४ वर्ष पूर्ण केली. फॅन्स आणि कुटूंब हेच माझे मोठी संपत्ती आहेत.''
आफ्रिदीनं २ ऑक्टोबर १९९६साली केनियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या वन डे सामन्यात त्यानं श्रीलंकेविरुद्ध ३७ चेंडूंत शतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आफ्रिदीनं २७ कसोटीत ३६.५१च्या सरासरीनं १७१६ धावा केल्या आणि ४८ विकेट्स घेतल्या. ३९८ वन डे सामन्यांत ८०४६ धावा व ३९५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ९९ ट्वेंटी-२० सामन्यांत १४१६ धावा व ९८ विकेट्स त्यानं टिपल्या.