महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:17 PM2019-11-13T16:17:32+5:302019-11-13T16:17:53+5:30

whatsapp join usJoin us
When MS Dhoni's astonishing prediction for Rohit Sharma came true | महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम

महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारताचा एक यशस्वी व चाणाक्ष कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वगुणाचे अनेक दाखले दिले जातात. खेळाडूच्या गुणांची अचूक जाण धोनीला असते आणि ते ओळखून त्यानं खेळलेले डावपेच अधिच अपयशी ठरलेले नाही. रोहित शर्माच्या बाबतितही त्यानं असंच एक भाकित केलं होतं आणि ते खरही ठरलं... रोहितनं त्या दिवशी जी खेळी केली, तिनं अनेक विक्रम मोडले. 

हिटमॅन रोहित शर्मानं आंततराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पाच वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी 264 धावांची भीमपराक्रमी खेळी केली होती. 173 चेंडूंत त्यानं 33 चौकार व 9 षटकार खेचले होते. विशेष म्हणजे धोनीनं या खेळीपूर्वीच एक भाकित केलं होतं आणि रोहितनं ते तंतोतंत खरं ठरवलं. धोनीनं ट्विट केलं होतं की,''जर भारताचा हा सलामनीवीर लवकर बाद झाला नाही, तर तो 250+ धावा कुटेल आणि तशी खेळी तो करू शकतो.''


 कोलकाता येथे झालेल्या सामन्यात रोहितनं श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. अजिंक्य रहाणे आणि रोहित सलामीला आले होते. रहाणे ( 28) धावा करून माघारी परतला. पण, रोहितनं एका बाजूनं तुफान फटकेबाजी केली. त्याच्या विक्रमी खेळीला कर्णधार विराट कोहलीनं (66) अर्धशतकी खेळी करून योग्य साथ दिली. भारतानं 5 बाद 404 धावांचा डोंगर उभा केला अन् श्रीलंकेचा डाव 251 धावांत गुंडाळून 153 धावांनी विजय मिळवला. 

Web Title: When MS Dhoni's astonishing prediction for Rohit Sharma came true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.