ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी आफ्रिदीला चांगलेच धारेवर धरले.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली होती. त्याला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी चांगलेच धारेवर धरले. भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनीही आफ्रिदीला खडे बोल सुनावले आहेत.
भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्व:ताच्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत? असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले होते.
आफ्रिदीच्या ट्विटवर कपिल देव म्हणाले आहेत की, " हा शाहिद आफ्रिदी कोण आहे? त्याला आपण एवढे महत्व का देत आहोत. या प्रकारच्या लोकांना आपण जास्त महत्व देता कामा नये. "
शाहिद आफ्रिदीने नेमके काय केले ट्विट?
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला. लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात त्याने गरळ ओकली. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनेच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.
'भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्वत:च्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत?'' असे शाहिदीनं ट्विटमध्ये म्हटले.
शाहिद आफ्रिदीने हा पहिल्यांदाच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला नाही. याआधी म्हणजेच गेल्यावर्षी त्याने याबाबतीत ट्विट केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते, काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून क्रूरतेचे शिकार होत आहेत. आता वेळ आली आहे की या समस्येचे निराकरण केले पाहिजे, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले. तसचे, दुस-या ट्विटमध्ये काश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे आणि आम्ही निरपराधांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
Web Title: Who is Shahid Afridi, no need to give importance to him - Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.