नवी दिल्ली : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यापासून सर्व जण आता दूरावा राखणेच पसंत करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघार बोलवले. त्यांच्यावरील शिक्षा ठरवण्यासाठी सहा सदस्यीय समितीही नेमण्यात आली आहे. त्या समितीचा निकाल येईपर्यंत पांड्या व राहुल यांनी बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनेच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. पांड्याच्या त्या बेलात वक्तव्यामुळे त्याचा मित्रपरिवारही नाराज झाला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री जिच्यासोबत पांड्याचे नाव जोडले गेले, तिनेही या विधानानंतर पांड्यासोबत मैत्री असल्याचा इन्कार केला.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्यासोबत पांड्याचे नाव अनेकदा जोडले गेले. त्याशिवाय कदिकीया पटेल, एली अवराम आदी पांड्याच्या चांगल्या मैत्रीणी असल्याचे बोलले जाते. ईशा गुप्ता तर अनेकदा पांड्यासोबत दिसलीही आहे. मात्र, करण जोहरच्या कार्यक्रमातील त्या वक्तव्यानंतर ईशानेही पांड्यासोबत मैत्री असल्याचा इन्कार केला. ईशा गुप्ता एका म्युझिक लाँचला गेली होती आणि तेथे तिला पांड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली,''तुम्हाला कोणी सांगितलं की तो माझा मित्र आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनाच हा प्रश्न विचारा.''
नक्की काय म्हणाला होता पांड्या?कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय, की ज्यामुळे तो खलनायक ठरला. करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.