लंडन : ‘वर्षातील न्यूझीलँडर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला इंग्लंडचा विश्वचषक स्पर्धेतील ‘हीरो’ बेन स्टोक्सने या पुरस्काराला नकार देताना म्हटले की, ‘किवी संघाचा कर्णधार केन विलियम्सन याचा योग्य दावेदार आहे.’ २८ वर्षीय स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता, पण तो १२ वर्षांचा असताना इंग्लंडमध्ये आला. त्याने विश्वचषक अंतिम सामन्यात झुंजार खेळ करीत न्यूझीलंडच्या आशेवर पाणी फेरले.
स्टोक्सने सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात म्हटले की, ‘वर्षातील न्यूझीलँडर पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने मी खूश आहे. मला आपल्या न्यूझीलंड व माओरी वारसाचा अभिमान आहे, पण माझ्या मते या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझे नामांकन योग्य नाही. अनेक लोक आहेत, ज्यांनी न्यूझीलंडसाठी बरेच काही केले आहे. ते माझ्या तुलनेत या पुरस्कारासाठी अधिक योग्य आहेत.’
स्टोक्सने विश्वचषकामध्ये ४६५ धावा केल्या व ७ बळी घेतले.
स्टोक्स म्हणाला, ‘मी इंग्लंडला विश्वविजेतेपद पटकावून देण्यास मदत केली आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालो आहे. माझ्या मते पूर्ण देशाने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सला समर्थन द्यावे. त्याला दिग्गज खेळाडू म्हणून सन्मान मिळायला हवा. त्याने विश्वचषकात आपल्या संघाचे भक्कम नेतृत्व केले. तो सर्वोत्तम खेळाडू ठरला. तो प्रेरणादायी कर्णधार आहे. त्याने कुठल्याही स्थितीत संयम ढळू दिला नाही. तो न्यूझीलंडच्या नागरिकांची योग्य ओळख आहे. तो या सन्मानासाठी योग्य आहे. माझा त्याला पाठिंबा आहे.’
Web Title: Williamson's 'New Zealander of the Year' award deserving contender - Stokes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.