Join us  

खेळाडूंच्या माघारीमुळे आयपीएलच्या चर्चांना उधाण

वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी खासगी कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:42 AM

Open in App

मागील काही दिवस चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगले राहिलेले नाहीत. आयपीएलसुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच दोन जण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. (सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापनासह १३ जण) त्यामुळे सप्टेंबरच्या निर्धारित वेळेत फ्रेंचायझी सलामीच्या सामन्यात खेळेल का, हा प्रश्न उभा राहिला आहे. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तरी सीएसकेला इतर अडचणींचाही सामना करावा लागला आहे.

वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी खासगी कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या सीएसकेमध्ये अस्वस्थता आहे. तसा हा एकमेव संघ नाही. मुंबई इंडियन्सचा अनुभवी लसिथ मलिंगा देखील बाहेर पडला आहे. मलिंगाच्या या निर्णयाची माध्यमांमध्ये फारशी चर्चा नाही. जशी चर्चा रैना आणि हरभजन यांच्या निर्णयाची झाली. कारण मलिंगा हा काही भारतीय खेळाडू नाही.

हे खेळाडू कोणत्या वेळेला बाहेर पडले. याबाबतच्या स्पष्टतेच्या अभावामुळे फक्त अंदाज वर्तवले जात आहेत. त्यावर फक्त चर्चा होत आहे. एखाद्या खेळाडूला कार्यक्रमातून किंवा स्पर्धेतून माघार घेण्यास कुणीही रोखू शकणार नाही. एक खेळाडू म्हणून माघार घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे.‘वैयक्तिक कारण’ हे सामान्यत: एखाद्या खेळाडूच्या अनुपस्थितीसाठी वैध कारण पुरेसे असते. मात्र रैना, हरभजन आणि मलिंगा यांचा प्रश्न हा लियोनेल मेस्सी प्रमाणे नाही. असा युक्तिवाद केला जाऊ शकतो.

मेस्सीलाही वैयक्तिक कारणास्तव बार्सिलोना क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे सांगितले जाते. कोविडच्या भीतीतही पारदर्शकता महत्त्वाची आहे. हे नदालने याबाबतचा निर्णय लवकर घेतला. नदालने युएस ओपनमध्ये भाग न घेण्याबद्दल लवकर स्पष्टता केली. ही स्पर्धा न खेळण्याची कारणे खूप आहेत. पण असल्यास हे जाहीरपणे का सांगितले जाऊ शकत नाही. सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी केलेल्या विधानांमुळे अफवांमध्ये भर पडली. आयपीएलमध्ये स्पष्टतेअभावी अंदाज आणि चर्चा वाढत आहेत. याबाबतची संपूर्ण स्पष्टतागरजेची आहे.

तीन क्रिकेटपटू आपात्कालीन स्थितीत अचानक आयपीएलमधून बाहेर पडले. मात्र ही निकड होती की अन्य काही समजून घेणे गरजेचे आहे. मलिंगाच्या परिस्थितीबद्दल मला अधिक माहिती नाही. मात्र रैनाने त्याच्याकुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे माघार घेतल्याचे म्हटले आहे. तरीही तो यूएईला का गेला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हरभजनसिहची आई गेल्या काहीकाळापासूनआजारी आहे. त्याने निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला.

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय