नवी दिल्ली : क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेशाचा मुद्दा बीसीसीआयने आमसभेत नेण्याचे ठरविले आहे. आम्ही आॅलिम्पिक चार्टरचे पालन करीत नसल्याने क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये प्रवेश करू नये, या मुद्यावर बीसीसीआय ठाम आहे. बीसीआय पदाधिकाºयांनी आज झालेल्या बैठकीत प्रशासकांच्या समितीला(सीओए) ही माहिती दिली.आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्याचा निर्णय आमसभा घेईल, असे सीओए सदस्य डायना एडलजी यांनी सांगितले. बीसीसीआयने क्रिकेटला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिल्यास बीसीसीआयला राष्टÑीय महासंघ संबोधले जाईल. शिवाय खेळाडूंना वाडाच्या नियमांतर्गत वास्तव्याशी संबंधित करारावर स्वाक्षरी करणे भाग पडेल. भारतीय क्रिकेटपटू या कराराच्या विरोधात आहेत. बीसीसीआयने या बाबी लक्षात घेऊनच आॅलिम्पिक समावेशास ठाम विरोध दशर््विला आहे.एडलजी यांनी विश्वचषकात शानदार कामगिरी करणाºया महिला संघाच्या राष्टÑीय निवडकर्त्यांना पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली होती. यावर बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी महिला संघ निवडकर्त्यांसोबत पुरुष संघाच्या निवडकर्त्यांना देखील पुरस्कार मिळावा, असा सल्ला दिला. महिला आणि पुरुष दोन्ही भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये उपविजेते राहिले हा तर्क देखील देण्यात आला.बीसीसीआय आंतरराष्टÑीय सामने तसेच आयपीएल या दरम्यानकिमान १५ दिवसांचा कालावधी मोकळा ठेवण्याची लोढा समितीची शिफारस मानण्याचे प्रयत्नकरीत असल्याचे एडलजी यांचेमत आहे. भविष्यातील दौºयाचे वेळापत्रक फार आधी तयार होत असल्यामुळे आम्ही शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे एडलजी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)राष्टÑीय निवडकर्त्यांना प्रत्येकी १५ लाखपुरुष आणि महिला राष्टÑीय निवड पॅनल सदस्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दोन्ही समित्यांना चांगला संघ निवडल्याबद्दल पुरस्कार मिळत आहे.अझहरचा निर्णय देखील आमसभेकडे..माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्या थकीत रकमेवर देखील चर्चा करण्यात आली. हे प्रकरण देखील आमसभेकडे पाठविण्याचा निर्णय झाला. अझहरवर बीसीसीआयने मॅच फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदी घातली होती. आंध्र उच्च न्यायालयाने मात्र २०१२ च्या निकालात अझहरवरील फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून त्याला मुक्त केले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅलिम्पिक क्रिकेटविनाच : बीसीसीआय ठाम
आॅलिम्पिक क्रिकेटविनाच : बीसीसीआय ठाम
क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेशाचा मुद्दा बीसीसीआयने आमसभेत नेण्याचे ठरविले आहे. आम्ही आॅलिम्पिक चार्टरचे पालन करीत नसल्याने क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये प्रवेश करू नये, या मुद्यावर बीसीसीआय ठाम आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:10 AM