world test championship Final 2021 मुंबई : जागतिक कसोटी चॅम्पिय़नशिपसाठी (world test championship) भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. परंतू त्या आधीच टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संघ सहकाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे. बुधवारी भारतीय संघ रवाना झाला. (Indian men's team under Virat Kohli will be playing 6 Tests on the tour of England )
इंग्लंडच्या विमानात बसण्याआधी विराटने एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटूंना सज्जड दम भरला. जर तुम्हाला वाटत असेल की फायनलमध्ये न्यूझीलंडचे पारडे जड आहे, तर विमानात बसू नका, असे त्याने म्हटले. दोन्ही संघ एकसमान आहेत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिय़नशिपमध्ये कोणत्याही एका संघाला ताकदवर म्हणणे योग्य ठरणार नाही, असे विराटने सांगितले.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये 18 जून ला इंग्लंडविरोधात फायनल कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर इंग्लंडविरोधात पाच टेस्ट मॅचची सीरीज असणार आहे.
आम्ही विमानात हा विचार करून चढणार आहोत, की आम्ही हर प्रकारे न्यूझीलंड एवढेच उत्तम आहोत, असे कोहली म्हणाला. कोहली प्रत्येक दौऱ्यावेळी अशीच तयारी करतो. टीमला जिंकण्याच्या मानसिकतेने खेळायला उतरण्यासाठी प्रेरित करतो. समोरचा संघ दबावाखाली आला पाहिजे. त्या संघाने आपला फायदा उठवता नये, असा कोहलीचा प्रयत्न असतो.
भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे न्यूझीलंडचे पारडे जड आहे असे म्हटले जात आहे. दुसरीकडे टीम इंडिया कमी प्रॅक्टीस आणि प्रॅक्टीस मॅच न खेळता फायनल मॅचमध्ये उतरणार आहे. 10 दिवसांचा क्वारंटाईन संपवावा लागणार आहे. यामुळे संघाला तयारीसाठी पुरेसा वेळ नाहीय.
Web Title: world test championship Final: Before leaving for England, Virat Kohli's warn team India on New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.