Shoaib Akhtar controversial statement on Virat-Anushka Marriage : पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमी त्याच्या वाचाळ वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सध्या Legends cricket league मध्ये आशियाई लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शोएब अख्तरनं सोमवारी विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. याचवेळी त्यानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा टीम इंडियाला पराभूत करण्याचा दावा केला. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या वर्ल्ड कप वेळापत्रकानुसार २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात सामना मेलबर्नवर सामना होणार आहे.
मेलबर्नवरही आम्ही भारताला पराभूत करू, असा दावा अख्तरनं केला आहे. तो म्हणाला,''पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारतापेक्षा वरचढ आहे. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो तेव्हा भारतीय मीडिया त्यांच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव निर्माण करतात.'' २०२१ मध्ये यूएईत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं प्रथमच टीम इंडियावर विजय मिळवला होता.
विराटच्या लग्नावरून अख्तरचं वादग्रस्त विधान
यावेळेस अख्तरनं विराटच्या कर्णधारपदासोबत त्याच्या लग्नाबाबतही मोठं विधान केलं. तो म्हणाला,''विराट कोहलीला कर्णधारपद देण्याच्या बाजूनं मी कधीच नव्हतो. माझ्यामते, त्यानं फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करायला हवं होतं. मी त्याच्या जागी असतो तर अनुष्का शर्मासोबत लग्न केलं नसतं. कारण, लग्नानंतर तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारीचं ओझं वाढतं.''
तो पुढे म्हणाला, मी त्याच्याजागी असतो तर लग्न केलं नसतं. क्रिकेटमध्ये १०-१२ वर्षांचा काळ अधिक महत्त्वाचा असतो. त्यात तुम्हाला धावा करून खेळाचा आनंद लुटायला हवा. लग्न करणं चुकीचं आहे, असं मी म्हणत नाही, परंतु जर तुम्ही भारतासाठी खेळताय तर तो काळ एंजॉय करायला हवा. फॅन्स कोहलीसाठी वेडे आहेत आणि त्यानंही २० वर्ष त्याला मिळालेलं प्रेम कायम राखायला हवं. त्यानं १२० शतकानंतर लग्न करायला हवं होतं. ''
''लग्न आणि कर्णधारपदाचं दडपण खेळावर परिणाम करतो. मुलं आणि कुटुंबाचं खूप दडपण असते. जसजशी जबाबदारी वाढते तसतसं दडपणही वाढतं. १४-१५ वर्ष क्रिकेटपटूचं करियर असतं आणि त्यात ५-६ वर्ष ही यशाचा काळ असतो. विराटचा तो काळ निघून गेला आहे आणि त्याला स्ट्रगल करावा लागणार आहे,''असेही अख्तर म्हणाला. नोव्हेंबर २०१९पासून विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेलं नाही. त्याच्या नावावर ७० आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.
Web Title: 'Wouldn't have married': Shoaib Akhtar reveals how Virat Kohli's marriage with Anushka affected his game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.