World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आजपासून भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिला दिवस वाया गेल्यामुळे आता 23 जून हा राखीव दिवसापर्यंत कसोटी चालणार आहे आणि आता पाच दिवसात निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाणार आहे. पण, आजच्या दिवसावरही पावसाचे सावट आहे, परंतु सध्यातरी पाऊसानं विश्रांती घेतली आहे. मागील 12 तासांत पाऊस पडलेला नाही आणि सकाळी सूर्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे कालच्या वाया गेलेल्या दिवसाची भरपाई करण्यासाठी आज दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि 2.30 वाजता नाणेफेक होईल. ( Match will start on time at 3 pm IST and toss at 2.30 pm IST)
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी IND vs NZ World Test Championship
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग