World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामना उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता या कसोटीच्या निकालासाठी राखीव दिवस नसणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागणार आहे. पहिल्या दिवशी पाऊस पडल्यानं खेळपट्टीवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया त्यांच्या अंतिम 11मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. टॉस अजून न झाल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) त्यांच्या अंतिम 11 बदल करण्यासाठी 24 तासांचा कालावधी मिळाला आहे. याबाबत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर ( R Sridhar) यांनीही त्यांचं मत मांडले आहे. ( day 1 called off, India has 24 hours to reconsider their playing eleven, R Sridhar on playing XI )
मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video
भारतीय संघानं गुरूवारीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली. विराटच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला स्थान देण्यात आलं असून वृद्धीमान साहा याला डगआऊटमध्येच बसावं लागणार आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाजीचं नेतृत्व रविचंद्रन अश्विन करणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला त्याला साथ देणार आहे. WTC Final 2021, WTC Final 2021
पण, आता खेळपट्टी व हवामान यांचा अंदाज घेता टीम इंडिया अंतिम 11मध्ये एक बदल करण्याची शक्यता आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनीही तसा सल्ला टीम इंडियाला दिला. त्यांनी सांगितले की, नाणेफेक करण्यापूर्वी टीम बदलली जाऊ शकते. जोपर्यंत दोन्ही कर्णधार खेळाडूंच्या नावाची यादी एकमेकांना देत नाहीत, तोपर्यंत काहीच अंतिम नसतं. त्यामुळे भारतानं एका फिरकीपटूला बसवून अतिरिक्त फलंदाज खेळवायला हवा.'' ( 'They might drop one spinner' - Sunil Gavaskar thinks India might change their playing XI for WTC final)
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
पर्याय म्हणून कोण बाहेर - लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज