ठळक मुद्दे श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड होण्यापूर्वी बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जे खेळाडू श्रीलंका दौ-यात नव्हते त्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट झाली.गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मबाबत आणि त्याच्या फिटनेसबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे धोनीच्या टिकाकारांकडून त्याची कामगिरी या टेस्टमध्ये कशी होती आणि त्याची निवड संघात का झाली असा प्रश्न सोशल मीडियावर सातत्याने विचारला जात आह
मुंबई, दि. 17 - श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड होण्यापूर्वी बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जे खेळाडू श्रीलंका दौ-यात नव्हते त्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट झाली. बीसीसीआयच्या या यो-यो टेस्टमध्ये पात्र ठरण्यासाठी कमीत कमी 16 गुणांची आवश्यकता असते. सध्याच्या भारतीय संघात यो-यो चाचणीमध्ये पात्र ठरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, युवराजला केवळ 13 गुण मिळाले त्यामुळे त्याची निवड झाली नाही. टेस्टमध्ये पात्र न ठरल्याने युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मबाबत आणि त्याच्या फिटनेसबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे धोनीच्या टिकाकारांकडून त्याची कामगिरी या टेस्टमध्ये कशी होती आणि त्याची निवड संघात का झाली असा प्रश्न सोशल मीडियावर सातत्याने विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिटनेसच्या बाबतीत धोनीमध्ये पूर्वीचीच क्षमता असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये धोनीने अनेक युवा खेळाडूंना मागे सोडलं आहे. या टेस्टमध्ये मनिष पांडेने 19.2 गुणांसह अव्वल स्थान मिळवले, तर भारतीय कर्णदार विराट कोहली या टेस्टमध्ये दुस-या क्रमांकावर होता. त्याने 19 गुण मिळवले. महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळख असलेला रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंना मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती आहे.
तरच भारतीय संघात संघात प्रवेश - शास्त्रीआगामी विश्वकप स्पर्धेसाठी संघ नियोजनाची सुरुवात केली आहे. ज्यावेळी विश्वचषकाचा विचार करतो तेव्हा माझं स्पष्ट मत असतं की, जो संघ विश्वचषकात खेळेल त्यामधील खेळाडू हे पूर्णपणे फिट असतील आणि फिल्डींगच्या बाबतीत श्रेष्ठ असतील. ते आपला फिटनेस कायम ठेवतील त्यांनाच पुढे संधी देण्यात येईल असे मत भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच क्लीनस्वीप नोंदवला. यावर ते म्हणाले की, संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भविष्यातही हे खेळाडू आपली कामगिरी चोख बजावतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, भविष्यात आपल्याला टेस्ट क्रिकेट खूप खेळायचे आहेत. टेस्ट क्रिकेटबरोबरच विश्वचषकावरही लक्ष द्यायला हवं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका सारखे संघ विश्वचषक आणि कसोटीसाठी विशेष प्लॅन तयार करत असतात. रवी शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे संघातील दिग्गज खेळाडूंना आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.
आणखी वाचा: (का झाली धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी?)