ढाका : खेळ म्हटलं की त्यात जय-पराजय हे आलंच... त्यामुळे आज जिंकणारा संघ उद्या जिंकेलच असं नाही. पण, एखाद्या संघाला विजयासाठी पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली, अशी घटना दुर्मिळच. झिम्बाब्वेने मंगळवारी बांगलादेशला कसोटी क्रिकेटमध्ये 151 धावांनी पराभूत केले. पाच वर्षांनंतर झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची चव चाखली. त्यांनी 2015 मध्ये अखेरचा विजय मिळवला होता. त्यानंतर आजच्या विजयाने खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झालेला.
झिम्बाब्वेच्या 321 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 169 धावांत माघारी परतला. फिरकीपटू ब्रेंडन मवूटाने पदार्पणात चार विकेट घेतल्या, त्याला सिकंदर राझाने 3 विकेट घेत उत्तम साथ दिली. या दोघांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला.
बागंलादेशकडून इम्रुल कायसने सर्वाधिक 43 धावा केल्या. झिम्बाब्वेने या विजयासह दोन कसोटीच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरी कसोटी 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ढाका येथे होणार आहे.
Web Title: Zimbabwe beat Bangladesh by 151 runs in first Test in 5 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.