Join us  

ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक

By ओमकार संकपाळ | Published: June 16, 2024 10:02 AM

Open in App
1 / 11

ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या ब गटातील ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना निर्णायक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे इंग्लंडला सुपर-८ मध्ये प्रवेश करता आला. पण, नवख्या स्कॉटलंडच्या संघाने दिलेली झुंज प्रेक्षणीय ठरली.

2 / 11

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्या स्कॉटलंडचा संघ विजय मिळवेल असे अपेक्षित होते. मात्र, कांगारूंंच्या फलंदाजांनी आपल्या अनुभवाचा पुरेपुर वापर करत विजयाचा चौकार लगावला. मार्कस स्टॉयनिस, ट्रॅव्हिस हेड आणि टीम डेव्हिड या त्रिकुटाने स्कॉटलंडच्या तोंडचा घास पळवला.

3 / 11

खरे तर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना म्हणजे केवळ सराव होता. पण स्कॉटलंडला सुपर-८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा होता. मात्र ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे इंग्लिश चाहत्यांना सुखद धक्का बसला.

4 / 11

ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारताच स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंगटन भावूक झाला. तो म्हणाला की, आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो. त्यामुळे मी खरोखर निराश आहे. आम्हाला सुपर-८ ची फेरी गाठायची होती. पण, दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.

5 / 11

प्रतिस्पर्धी संघाच्या खेळीला दाद देताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने म्हटले की, स्कॉटलंड हा खूप चांगला संघ आहे. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. त्यांनी हा सामना एकतर्फी होऊ दिला नाही.

6 / 11

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील चारही सामने जिंकून ८ गुण मिळवले. तर इंग्लंड आणि स्कॉटलंड हे संघ प्रत्येकी ५-५ गुणांवर राहिले.

7 / 11

इंग्लंड आणि स्कॉटलंड दोघांचेही प्रत्येकी ५-५ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंड (+३.६११) पुढे असल्याने त्यांना फायदा झाला. स्कॉटलंड पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

8 / 11

एकूणच ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा चौकार अन् स्कॉटलंडचा पराभव... यामुळे इंग्लिश संघाला सुपर-८ मध्ये खेळण्याची आयती संधी मिळाली.

9 / 11

स्कॉटलंडने दिलेल्या १८१ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार खेळी केली. याशिवाय मार्कस स्टॉयनिसने स्फोटक खेळी करताना २९ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकार लगावून ५९ धावा केल्या. पण, हे दोघेही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत.

10 / 11

शेवटच्या काही षटकांत टीम डेव्हिडने मोर्चा सांभाळला. त्याने १४ चेंडूत नाबाद २८ धावा करून ऑस्ट्रेलियाला ५ गडी आणि २ चेंडू राखून विजय मिळवून दिला. यासह स्कॉटलंड स्पर्धेबाहेर झाला अन् इंग्लंडला सुपर-८ चे तिकीट मिळाले.

11 / 11

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इंग्लंडआॅस्ट्रेलिया