'मुंबईचा राजा रोहित शर्मा' समोर पॅट कमिन्सचा 'पंजा'; कितव्यांदा बोल्ड झाला माहितीये? इथं पाहा रेकॉर्ड

रोहित शर्मावर ओढावली नामुष्की, जाणून घ्या बोल्ड आउट होण्याचा त्याचा रेकॉर्ड

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही फ्लॉप ठरला. पहिल्या डावात स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर फसलेल्या रोहितला दुसऱ्या डावात पॅट कमिन्सनं बोल्ड केले.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५ चेंडूचा सामना करून रोहित शर्मा ६ धावांवर तंबूत परतला.

रोहित करिअरमध्ये सहाव्यांदा एका कसोटी सामन्यात दुहेरी आकडा न गाठता तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. मार्च २०२४ मध्ये केलेल्या शतकी खेळीनंतर तो सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताना दिसले आहे.

रोहितनं आतापर्यंतच्या कसोटी करिअरमध्ये ११ डावात पॅट कमिन्सचा सामना केला आहे. यात १८४ चेंडूचा सामना करताना त्याने १२० धावा काढल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात पाचव्यांदा रोहित शर्माला बोल्ड केले.

रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये २०१३ ते २०२२ या कालावधीत ७७ डावात फक्त ११ वेळा बोल्ड झाला होता.

पण २०२२ ते २०२४ या कालावधीत ३६ डावात त्याच्यावर ११ वेळा बोल्ड आउट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याची वेळ आली आहे.