Cricket Buzz»फोटो गॅलरी »"T20 World Cup साठी 'हा' खेळाडू संघात असणं म्हणजे भारतासाठी 'प्लस पॉईंट""T20 World Cup साठी 'हा' खेळाडू संघात असणं म्हणजे भारतासाठी 'प्लस पॉईंट" By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 1:29 PMOpen in App1 / 6Sunil Gavaskar Team India | यंदाचा टी२० विश्वचषक (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाणार आहे. गेल्या T20 World Cup मधील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर यावर्षी आतापासूनच चाहत्यांच्या नजरा विश्वचषक स्पर्धेकडे लागल्या आहेत.2 / 6भारताने २०१३ साली शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा खूपच जास्त आहेत.3 / 6अशातच महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी T20 World Cup संदर्भात भारतीय संघाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एक विशिष्ट खेळाडू T20 World Cupसाठीच्या भारतीय संघात असणं म्हणजे टीम इंडियासाठी 'प्लस पॉईंट' असेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.4 / 6गावसकर म्हणाले, 'तो खेळाडू खरंच अप्रतिम कामगिरी करतो. पांढरा चेंडू तितका स्विंग होत नाही हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्याकडे पांढरा चेंडू स्विंग करण्याची देखील कला आहे.'5 / 6'रिषभ पंतला त्याच्या या कलेबाबत कल्पना होती म्हणूनच त्याने या गोलंदाजाला सलग तिसरे षटक टाकू दिले आणि त्याचा फायदा संघाला झाला. कारण सहा-सात षटकांच्या खेळानंतर चेंडू स्विंग होणार नाही याची साऱ्यांना कल्पना होती.'6 / 6'चेंडू स्विंग होणं थांबलं की अशा गोलंदाजांचा प्रभाव कमी होतो हे आपल्याला माहिती आहे. पण ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cupसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सारखा खेळाडू संघात असणे हा संघासाठी नक्कीच प्लस पॉईंट ठरेल', असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला. आणखी वाचा Subscribe to Notifications