5 Big Rule Changes : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, १ ऑक्टोबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे आणि त्यापैकी ५ नवे नियम यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत निर्णायक ठरू शकतात..