Cricket Buzz»फोटो गॅलरी »Happy Birthday सुरेश रैना...Happy Birthday सुरेश रैना... By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:53 PMOpen in App1 / 9भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचा आज 32वा वाढदिवस. 27 नोव्हेंबर 1986 मध्ये उत्तर प्रदेश येथे त्याचा जन्म झाला. वयाच्या 18व्या वर्षी त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्यानंतर आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने आपली छाप पाडली. 2 / 9सुरेश रैनाने 2003 मध्ये उत्तर प्रदेशच्या रणजी संघाकडून पदार्पण केले. 16 व्या वर्षी पदार्पण करणारा रैना त्या सत्रात एकही सामना खेळू शकला नाही. त्याचवर्षी त्याने आशियाई वन डे चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा केला. 3 / 92004च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. मात्र, भविष्यात तो मोठा फलंदाज बनेल असे संकेत त्याने दिले होते. त्या स्पर्धेनंतर त्याने तीन अर्धशतक केले. त्याची 38 चेंडूंत 90 धावांची खेळी ही सर्वोत्तम होती. 4 / 9भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. 5 / 92010 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. अनिर्णीत ठरलेल्या त्या सामन्यात रैनाने 120 धावा केल्या होत्या. पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 12 वा खेळाडू ठरला. 6 / 9ट्वेंटी-20 आणि वन डे विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणाराही तो भारताचा पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज आहे. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 60 चेंडूंत ( 9*4 व 5*6) 101 धावा केल्या होत्या. 7 / 92005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आणि त्याला शून्यावर माघारी परतावे लागले होते. 8 / 9इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रैनाच्या नावावर आहे. त्याने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या आहेत. 9 / 9रैनाने भारतासाठी 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 768, वन डेत 5615 आणि ट्वेंटी-20त 1604 धावा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications