Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये कोण आहे 'फिरकी' बहाद्दर, कोण अव्वल?ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये कोण आहे 'फिरकी' बहाद्दर, कोण अव्वल? By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 10:40 AMOpen in App1 / 7साऊथम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. शकिबने या सामन्यात 51 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट्सही टिपल्या. अशी दुहेरी कामगिरी करणारा शकीब हा युवराज सिंगनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. शकिबने 29 धावा देत 5 फलंदाज बाद केले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील फिरकीपटूची ही सहावी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. 2 / 7पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनं 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केनियाविरुद्ध 16 धावांत 5 बळी टिपले होते.3 / 7झिम्बाबेचा पॉल स्ट्रँगनेही 1996साली 21 धावांत केनियाच निम्मा संघ माघारी पाठवला होता.4 / 7पाकच्या आफ्रिदीनं 2011मध्येच कॅनडाच्या पाच फलंदाजांना अवघ्या 23 धावांत तंबूत धाडले होते.5 / 7केनियाच्या कॉलिन ओबुयाने 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 24 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.6 / 71996च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीच्या शौकत दुकानवालाने नेदरलँड्सविरुद्ध 29 धावांत 5 बळी टिपले.7 / 7या क्रमवारीत बांगलादेशच्या शकिब अल हसनने अफगाणिस्तानविरुद्ध 29 धावांत 5 विकेट्स घेत एन्ट्री घेतली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications