Join us  

Rohit Sharma, IND vs SL, 1st T20I: १६ सामन्यांत १५ विजय; रोहित शर्माने करून दाखवले भारताच्या एकाही कर्णधाराला न जमलेले विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 10:55 PM

Open in App
1 / 8

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला.

2 / 8

त्यानंतर भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्या तीन षटकांत दोन धक्के देत श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल व पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करताना भारताचा विजय पक्का केला. श्रीलंकेला ६ बाद १३७ धावा करता आल्या आणि भारताने ६२ धावांनी सामना जिंकला.

3 / 8

इशान किशन आणि रोहित यांनी भारताला पहिल्या विकेटसाठी १११ धावांची सलामी मिळवून दिली. रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत झाला. इशानने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला.

4 / 8

प्रत्युत्तरात भुवीने पहिल्याच चेंडूवर पथूम निसंकाची विकेट घेतली.त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने कामिल मिशारा ( १३) याची विकेट घेतली. भुवनेश्वरने २ षटकांत ९ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेशने ३६ धावांत २ बळी टिपले. युझवेंद्र व जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. असालंका सोडल्यास श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांकडून संघर्ष दिसला नाही. श्रीलंकेचा चरिथ असालंकाने एकट्याने संघर्ष करताना नाबाद ५३ धावा केल्या.

5 / 8

रोहित शर्माने ४४ धावा करून मोठा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान रोहितने पटकावला. त्याने ३३०४ धावा करताना मार्टिन गुप्तील ( ३२९९) व विराट कोहली ( ३२९६ ) यांना मागे टाकले

6 / 8

भारताचा हा सलग १०वा ट्वेंटी-२० विजय आहे आणि आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी पाकिस्तानचा २०१८ साली सलग ९ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. अफगाणिस्ता १२ विजयांसह अव्वल क्रमांकावर आहे.

7 / 8

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित भारताचा यशस्वी कर्णधार ठरला. त्याने १६ पैकी १५ सामने जिंकले आहेत आणि यासह त्याने इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५ विजय, २५ सामने) व न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५ विजय, ३० सामने) यांच्याशी बरोबरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचचा १४ विजयांचा ( २५ सामने) विक्रम मोडला.

8 / 8

भारताचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील श्रीलंकेविरुद्धचा १५ वा विजय आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध १५ विजय मिळवले आहेत आणि झिम्बाब्वेविरुद्ध १६ विजय मिळवून एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या विक्रमात पाकिस्तान आघाडीवर आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माइशान किशनश्रेयस अय्यर
Open in App