Cricket Buzz»फोटो गॅलरी »India tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढलीIndia tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढली By स्वदेश घाणेकर | Published: October 26, 2020 4:13 PMOpen in App1 / 9इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. 2 / 9निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जम्बो संघ पाठवण्याची तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे. 3 / 9पण, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये टीम इंडियातील प्रमुख शिलेदारांना झालेली दुखापत ही निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करताना BCCIचा कस लागणार आहे.4 / 9इशांत शर्मा - दिल्ली कॅपिटल्सच्या जलदगती गोलंदाजाने आयपीएलमधून माघार घेतली.5 / 9भुवनेश्वर कुमार- सनरायझर्स हैदराबादचा उप कर्णधार आणि प्रमुख गोलंदाजानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे.6 / 9रोहित शर्मा - हॅमस्ट्रींगमुळे रोहित शर्मा मागील दोन सामने खेळलेला नाही आणि त्याची दुखापत बरं होण्याचं नाव घेत नाही.7 / 9हार्दिक पांड्या - मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूनं दमदार फटकेबाजी केली असली तरी त्यानं एकाही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे त्याचा कसोटी संघासाठी विचार केला जाऊ शकत नाही8 / 9मयांक अग्रवाल - किंग्स इलेव्हन पंजाबच्या सलामीवीरालाही किरकोळ दुखापत झाली आहे.9 / 9नवदीप सैनी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या गोलंदाजाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications