Join us  

मुंबई इंडियन्ससाठी कटू आठवण आहे यूएईमधला तो रेकॉर्ड, आता रोहित शर्मा इतिहास बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 4:34 PM

Open in App
1 / 7

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अऱब अमिरातीमध्ये आयोजित होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमधील सलामीच्या लढतील गतवेळचे विजेते आणि उपविजेते असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत.

2 / 7

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर चार वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला यूएईमधील एक कटू रेकॉर्ड सतावत आहे.

3 / 7

आयपीएलमधील दादा संघ समजल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सची यूएईमधील कामगिरी अत्यंत सुमार आहे. २०१४ मध्ये यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलवेळी मुंबई इंडियन्सने इथे पाच सामने खेळले होते. मात्र या पाचही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

4 / 7

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे २० सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांविरुद्ध सामने खेळले होते. या सर्व सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.

5 / 7

त्यानंतर स्पर्धेचा उतरार्ध भारतात सुरू झाल्यावर मुंबईने किंग्स इलेव्ह पंजाबला पराभूत केले होते.

6 / 7

दरम्यान, त्या हंगामान मुंबईच्या संघाने जोरदार कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. मात्र एलिमिनेटर लढतीत मुंबईली चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

7 / 7

आता शनिवारपासून यूएईमध्ये सुरू होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात हा जुना कटू इतिहास बदलण्याचे आव्हान रोहित शर्मा आणि त्याच्या मुंबई इंडियन्ससमोर असेल.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2020रोहित शर्मासंयुक्त अरब अमिराती