BCCIचे 'Star' चमकले!; IPL Media Rightsमध्ये रिलायन्सने करेक्ट कार्यक्रम केला, Hotstarला धक्का दिला

IPL Media Rights: Star Sports have retained IPL TV Rights; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

IPL Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन दिवस चाललेल्या A - B पॅकेजसाठी काल 40 हजार कोटींपर्यंत लागलेली बोली आज 44, 075 कोटींपर्यंत येऊन थांबली. पण, सायंकाळपर्यंत टीव्ही व डिजिटल प्रसारणाचे हक्क कोणी जिंकले हे स्पष्ट होत नव्हते.

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील 5 वर्षांच्या कालवधीसाठी प्रसारण हक्कांचा ई लिलाव झाला. Disney Star vs Sony Network vs Reliance Viacom18 यांच्यात खरी टक्कर रंगली. ZEE डिजिटल राईट्ससाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. Amazon व Google यांनी या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्याने रिलायन्स व स्टार अशी थेट लढत रंगली.

यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.

पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी; पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी; पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी; पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी

२००८ साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी या कंपनीने ८२०० कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर २०१७ ला स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बोली होती.

आज आयपीएल 2023-27 प्रसारण हक्कासाठीच्या A व B पॅकेजसाठी एकूण 44,075 कोटींची बोली लागली गेली. टीव्हीवरील प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 57.5 कोटी म्हणजेच एकूण 23,575 कोटींची बोली निश्चित झाली, तर डिजिटल प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 50 कोटी म्हणजेच एकूण 20,500 कोटी रुपये मोजले जातील.

जगातील सर्वात महागड्या क्रीडा स्पर्धांच्या मीडिया राईट्समध्ये आयपीएलने दुसरे स्थान पटकावले आहे. NFL च्या एका सामन्यासाठी 133 कोटी रुपये मिळतात ( IPL - Now becomes 2nd most expensive and costliest sports league in the World after NFL in media rights.)

स्टार स्पोर्ट्सने 23,575 कोटींची बोली लावून टीव्हा प्रसारणाचे हक्क जिंकले आहेत. पण, हॉटस्टारला डिजिटल हक्क मिळवता आले नाही. यावेळी रिलायन्सच्या Viacom18 ने बाजी मारली. त्यासाठी 20,500 कोटी मोजले गेले. त्यामुळे हॉटस्टार ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे.