Cricket Buzz»फोटो गॅलरी »'मूछें हो तो धोनी जैसी'! कॅप्टन कूल धोनीचा नवा लूक पाहिलात का?, शिमल्यात करतोय एन्जॉय पाहा PHOTOS'मूछें हो तो धोनी जैसी'! कॅप्टन कूल धोनीचा नवा लूक पाहिलात का?, शिमल्यात करतोय एन्जॉय पाहा PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 12:11 PMOpen in App1 / 10महेंद्रसिंग धोनीनं ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. त्यानंतर धोनी बहुतेकवेळा शेतात किंवा कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करताना दिसला. धोनी सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.2 / 10धोनी सध्या पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत शिमलामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर धोनी त्याच्या कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शिमल्यात पोहोचला आहे. 3 / 10धोनीनं शिमल्यात आल्याचं कळाल्यानंतर काही फॅन्सही तिथं पोहोचले आणि धोनीनंही त्यांनना निराश केलं नाही. धोनीनं चाहत्यांना स्वाक्षरी देत त्यांची दखल घेतली. 4 / 10धोनीनं शिमला येथे कुटुंबियांसोबत काही फोटो देखील टिपले आहेत. यात धोनीचा नवा लूक पाहायला मिळतोय. धोनीनं 'सिंघम स्टाइल' मिशी ठेवलीय. त्याच्या या हटके लूकची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. 5 / 10धोनीनं यावेळी शिमल्यात तयार होणाऱ्या बॅट्सचं कौतुक देखील केलं. इतकंच नव्हे, तर शिमलास्थित डीए स्पोट्स कंपनीचे संचालक वीनू दिवान देखील धोनीला भेटण्यासाठी पोहोचले होते. यात दिवान यांनी धोनीला चार बॅट्स देखील भेट म्हणून दिल्या. 6 / 10शिमला येथील सांस्कृतिक कुल्लु टोपी देऊन धोनीनं स्वागत करण्यात आलं होतं. धोनीनं आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत यशस्वी कामगिरीची नोंद केली आहे.7 / 10धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी चॅम्पियन्स करंडक, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि आससीसी टी-२० विश्वचषक अशा मानाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. इतंकच नव्हे, तर चेन्नई नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्ज संघानं आयपीएलमध्ये चारवेळा जेतेपद प्राप्त केलं आहे. 8 / 10धोनी सध्या शिमल्याच्या डोंगराळ भागात सुट्टीचा आनंद घेतोय. यात तो जास्तीत जास्त कुटुंबियांना वेळ देण्याचा प्रयत्न करतोय. मुलगी झिवासोबत मजामस्ती करताना धोनी दिसून आळा. 9 / 10धोनी कुटुंबीयांसह शिमल्यातील होम स्टे व्हाइट हेवन येथे थांबला आहे. यात धोनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबतची फोटो सेशन करताना दिसला. 10 / 10धोनी हिमाचल प्रदेशातील सर्वात लोकप्रिय जुब्बल कोटखाई येथील रतनाडी पंचायतमध्येही पोहोचला होता. रतननाडीमधील मीना बाग होमस्टेमध्ये तो वास्तव्याला होता. याठिकाणच्या सफरचंदाच्या बागांना धोनीनं भेटी दिल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications