Join us  

किवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:49 AM

Open in App
1 / 7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकणाऱ्या 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनीला न्यूझीलंडमध्येही एक विक्रम खुणावत आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि या मालिकेला 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

2 / 7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीने तिन्ही सामन्यांत अर्धशतकी खेळी करून एकूण 193 धावा केल्या होत्या. त्याचा हाच फॉर्म न्यूझीलंडनमध्येही कायम राहिल्यास तो एक विक्रम नावावर करू शकतो. न्यूझीलंडमध्ये त्यांच्याचविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा विक्रम धोनीला खुणावत आहे. तसे करण्यात यशस्वी झाल्यास तो सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.

3 / 7

तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 18 डावांत 38.35 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग 12 डावांत 54.36च्या सरासरीने 598 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

4 / 7

न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाची वन डे क्रिकेटमधील कामगिरी चांगली झालेली नाही. भारताला येथे 34 वन डे सामन्यांत केवळ 10 सामने जिंकता आले आहेत.

5 / 7

न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाने 8 द्विदेशीय मालिका खेळल्या आहेत आणि त्यात भारताने केवळ एकच मालिका जिंकली आहे.

6 / 7

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009 मध्ये वन डे मालिका 3-1 अशी खिशात घातली होती. न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकणारा तो भारताचा पहिलाच संघ होता.

7 / 7

धोनीने या दौऱ्यात पाच सामन्यांत 197 धावा केल्या, तर तो या विक्रमात आघाडीवर येईल. त्याने 9 डावांत 76 च्या सरासरीने 456 धावा केल्या आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध न्यूझीलंड