Cricket Buzz»फोटो गॅलरी »'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:29 PMOpen in App1 / 51. प्रशिक्षण कौशल्य : संघाला तुम्ही कसे आणि काय प्रशिक्षण देता. त्यामध्ये किती व्यावसायिक गोष्टींचा समावेश असतो. प्रशिक्षणाचा दर्जा नेमका कसा आहे आणि आपले प्रशिक्षण अन्य संघांपेक्षा चांगले कसे ठरते, हे यामध्ये पाहिले जाते.2 / 5२. अनुभव : आतापर्यंत तुम्हाला एक खेळाडू म्हणून खेळाचा आणि प्रशिक्षणाचा किती अनुभव आहे. तुमच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही संघाला मिळवून दिल्या आहेत.3 / 5३. यश : तुम्ही प्रशिक्षक असताना संघाला किती यश मिळाले. कोणत्या क्षेत्रात संघ यशस्वी ठरला. आतापर्यंतच्या या यशामध्ये काय वेगळेपणा होता.4 / 5४. बांधिलकी : तुमची संघाबरोबर किती बांधिलकी आहे आणि संघासाठी तुम्ही काय करू शकता.5 / 5५. संवाद : संघातील खेळाडूंबरोबर तुमचा कसा संवाद आहे. संघाला किंवा क्रिकेट मंडळाबरोबर तुमचा संवाद कसा आहे. त्याचबरोबर निवड समिती आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही कसा व्यवहार ठेवता. आणखी वाचा Subscribe to Notifications