Cricket Buzz»फोटो गॅलरी »अॅडलेडवरील 'हे' आकडे थक्क करतीलअॅडलेडवरील 'हे' आकडे थक्क करतील By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 11:50 AMOpen in App1 / 5भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना अॅडलेड येते खेळवला जाईल. या खेळपट्टीवर गवत असण्याचे संकेत क्युरेटरने दिले आहेत. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी जाणून घ्या काही विक्रम2 / 5भारतीय संघाने अॅडलेड येथे 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 7 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तीन सामने अनिर्णीत राहिले आणि केवळ एकच सामना भारताला जिंकता आला आहे. 3 / 5राहुल द्रविडने अॅडलेडवर केलेली 233 धावांची खेळी भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम आहे. 2003 मध्ये द्रविडने केलेली ही खेळी अॅडलेडवरील तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली. यात मैदानावर सर डॉन ब्रॅडमन यांची नाबाद 299 धावांची खेळी ही सर्वोत्तम आहे.4 / 5ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने अॅडलेडवर 56 विकेट घेतले आहेत. या खेळपट्टीवर सर्वाधिव विकेट घेणाऱ्या अव्वल पाच गोलंदाजांमध्ये दोन ( वॉर्न आमि नॅथन लायन) फिरकीपटू आहेत.5 / 5अॅडलेड कसोटीत पाच गोलंदाजांनी एका डावात आठ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. भारताकडून कपिल देव यांनी 1985 मध्ये 106 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना माघारी धाडले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications