कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडू आपापल्या घरीच थांबले आहेत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही 31 मे पर्यंत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे तेथे कौंटी क्रिकेटही होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यातून पुन्हा मायदेशी परतला. त्यामुळे इंग्लंडचे अनेक क्रिकेटपटूही घरीच आहे. घरी राहूनही अनेक क्रिकेटपटूंचा सराव सुरू आहे. पण, इंग्लंडच्या क्रिकेटपटूला घरी राहणं कसं महागात पडतंय हे तुम्हीचा पाहा.
इंग्लंडच्या वन डे संघाचा उपकर्णधार जोस बटलरही घरीच आहे आणि तो कुटुंबीयांसोबत हा क्षण एंजॉय करत आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्यानं इंग्लंडच्या कसोटी संघाची जर्सी घातली आहे आणि फलंदाजी करण्यासाठी तो सज्ज असलेला पाहायला मिळत आहे. पण, या व्हिडीओत पत्नी लुसी ही त्याची शाळा घेताना दिसत आहे. लुसी जोसला व्यायामाचे पाच प्रकार शिकवत आहे.
जोस बटलर हा श्रीलंका दौऱ्यावर इंग्लंडच्या संघासोबत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला होता. पण, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे. पण, ही स्पर्धा 15 एप्रिल पुढे ढकलण्यात आली आहे.
लंडनमध्ये आतापर्यंत 5 हजाराहून अधिक लोकांना कोरोना लागण झाली आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू अॅलेक्स हेल्स, टॉम कुरण आणि जेड डेर्नबॅच हे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. हेल्स पाकिस्तान सुपर लीगमधून मायदेशी परतला आणि तेव्हा त्याला कोरोना झाल्याची चर्चा रंगली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल
IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड
पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल
Good News : सुरेश रैनाच्या घरी पाळणा हलला, पुत्ररत्न प्राप्ती झाली
Video : रोहित शर्माचा कन्येसोबत रंगला क्रिकेट सामना, पाहा कोण जिंकलं
शाहिद आफ्रिदी गरजूंना पुरवतोय रेशन; पाकिस्तानी जनतेला केलं आवाहन
Web Title: Video: Jos Buttler works out with wife in his England Test apparel during quarantine time svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.