संचारबंदी असताना गडहिंग्लजमध्ये सिनेमागृहातील जुगार अड्ड्यावर छापा, १३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:36 PM2020-04-24T22:36:24+5:302020-04-24T22:36:52+5:30
छाप्यात सुमारे पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सिनेमागृह मालक व चालकासह पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.
कोल्हापूर - गडहिंग्लज शहरातील मध्यवस्तीतील सुभाष चित्र मंदिरातील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सुमारे पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सिनेमागृह मालक व चालकासह पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.
सिनेमागृहाचे मालक सुमित संजयकुमार मणियार,चालक
केंपाण्णा रुद्राप्पा कोरी( ३८) यांच्यासह त्याठिकाणी जुगार खेळताना सापडलेले राजासाहेब गणीसाहेब मकानदार (४२) आयुब गणीसाहेब मकानदार ( ४०) अंकुश वसंतराव दोडमणी (२९) राजेंद्र भमानगोळ (३१), जमीर सत्तार खलिफा (४०) गणेश सुभाष माळी (३४) महेश भमानगोळ (४४) सुनिल श्रीपती पाटील (४४), रमेश मल्लाप्पा मुदकण्णावर (२५), अभिजित ओतारी (३४) गिरीश पट्टणशेटी ( ३४ सर्वजण रा. गडहिंग्लज) अशी आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सध्या कोरोनाच्या संचारबंदी व लाॅकडाऊनमुळे बंद असणाऱ्या या सिनेमागृहात तीन पानी जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडुन मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी आज दुपारी हा छापा टाकला.
छाप्यात पत्ते, रोख २६ हजार, मोटरसायकली,१० मोबाइल हँडसेट , सिलिंडर, शेगडी,पाण्याची टाकी,पातेले असे एकूण ७ लाख ७२ हजार,५७० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.भर दुपारी झालेल्या या कारवाईमुळे शहर आणि परिसरातील अवैधधंदे चालकांत खळबळ उडाली आहे.
हवालदार विठ्ठल कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.सपोनि दिनेश काशिद अधिक तपास करीत आहेत.