पिताच झाला हैवान! आई-भावंडांनी सोडलं, बापाने केला लेकीचा सौदा; पैशासाठी तीनदा विकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:42 PM2023-04-05T17:42:25+5:302023-04-05T17:42:38+5:30

एका वडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला तीनदा विकलं. याप्रकरणी आता पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

17 year old girl was sold by her father 3 times in different places in bundi rajasthan | पिताच झाला हैवान! आई-भावंडांनी सोडलं, बापाने केला लेकीचा सौदा; पैशासाठी तीनदा विकलं

पिताच झाला हैवान! आई-भावंडांनी सोडलं, बापाने केला लेकीचा सौदा; पैशासाठी तीनदा विकलं

googlenewsNext

राजस्थानमधील बुंदी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला तीनदा विकलं. याप्रकरणी आता पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. रिपोर्टनुसार, राजस्थानमध्ये एका वाईट प्रथेच्या नावाखाली वडिलांनी वेगवेगळ्या रकमा घेऊन मुलीला तीन वेळा तीर्थक्षेत्रांवर विकले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

मुलीच्या वडिलांचाही अटक केलेल्या लोकांमध्ये समावेश आहे. बुंदी जिल्ह्यातील हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षांची मुलगी नाता कुप्रथेची बळी ठरली. या मुलीला तिची आई आणि भावंडं सोडून गेल्यावर वडिलांनी पैशाच्या लालसेपोटी मुलीशी सौदा केला. वडिलांनी पैसे घेऊन मुलीला तीन वेगवेगळ्या ठिकाणी विकले. 

अशा परिस्थितीत पीडिता व तिच्या भावोजीने ही बाब बाल कल्याण समितीसमोर आणली असता बाल कल्याण समितीने हिंदोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कारवाई करताना पोलिसांनी मुलीची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. समाजातील हे प्रकार आजही मुलींसाठी शापापेक्षा कमी नाहीत.

नाता प्रथेमध्ये, काही जातींमध्ये, पत्नी आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहू शकते. याला नाता करणं असं  म्हणतात. यामध्ये कोणतीही औपचारिक प्रथा नाही. फक्त परस्पर संमती आहे. ही प्रथा राजस्थानमधील एका समाजात प्रचलित आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: 17 year old girl was sold by her father 3 times in different places in bundi rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.