गुजरातमधील होलसेल व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 02:53 PM2023-09-15T14:53:23+5:302023-09-15T14:53:37+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-१ मध्ये राहणारे सुरेंद्रसिंग दिलजीतसिंग छाबरा व रिंकू सुरेंद्रसिंग छाबरा हे कपड्याचे व्यापारी आहेत.  गुजरात अहमदाबाद येथील कलर्स क्रिएश

19 lakh fraud of a wholesale trader in Gujarat! | गुजरातमधील होलसेल व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक!

गुजरातमधील होलसेल व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक!

googlenewsNext

उल्हासनगर : गुजरात अहमदाबाद येथील रेडिमेड कपड्याचे होलसेल व्यापारी आशिष सुभाषचंद्र कोहिली यांची उल्हासनगरच्या पती-पत्नी व्यापाऱ्यांनी १९ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. उल्हासनगर कॅम्प नं-१ मध्ये राहणारे सुरेंद्रसिंग दिलजीतसिंग छाबरा व रिंकू सुरेंद्रसिंग छाबरा हे कपड्याचे व्यापारी आहेत. 

गुजरात अहमदाबाद येथील कलर्स क्रिएशन होलसेल रेडिमेड कपड्याचे व्यापारी आशिष सुभासचंद कोहली यांची ओळ्ख उल्हासनगरातील छाबरा पती-पत्नी सोबत मध्यस्थी एजंट असलेले सुरेश बागवानी यांनी शहरातील हरदासमल हॉटेल येथे मोठे कपड्याचे व्यापारी म्हणून करून दिली. छाबरा पती-पत्नीने संगनमताने आठ दिवसाच्या क्रेडिटवर २८ लाख ६२ हजार ८५५ रुपयांचे कपडे शुभम टेक्स्टाईल नावाने कोहली यांच्याकडून खरेदी केले. त्यापैकी ९ लाख ५५ हजार ७०३ रुपये कोहली यांना दिले. मात्र बाकी राहिलेल्या १९ लाख ७ हजार ७०३ रुपयांचा रेडिमेड कपड्याचा माल परत करणार असल्याचे सांगितले. 

कोहली यांच्याकडे रेडिमेड कपड्याचे बिल देऊन, ते खरे असल्याचे भासविले. मात्र कपडे परत न करून फसवणूक केल्याचे उघड झाले. आशिष कोहली यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केल्यावर, छाबरा दाम्पत्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: 19 lakh fraud of a wholesale trader in Gujarat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.