ठळक मुद्दे गेल्यावर्षी मार्च 2018 मध्ये फारूक टकल्याला दुबईत अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. लंबूला जून 2018 मध्ये अहमदाबादहून अटक करण्यात आली आहे.हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमचे साथीदार आहेत
मुंबई - १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक कलेल्या दोन आरोपींविरोधात काल मुंबई सत्र न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. यासीन मन्सूर मोहम्मद फारूक उर्फ फारूक टकल्या आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू या दोघांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.
हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमचे साथीदार आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार हे दोघंही या बॉम्ब स्फोटांचा कट रचण्यासाठी आयोजित केलेल्या अनेक बैठकांसाठी हजर होते.या दोघांविरोधात 'टाडा' आणि भा. दं. वि. च्या विविध कलमांखाली हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आरोप निश्चित करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मार्च 2018 मध्ये फारूक टकल्याला दुबईत अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. तर लंबूला जून 2018 मध्ये अहमदाबादहून अटक करण्यात आली आहे.Web Title: 1993 serial blasts case:Definite Charges Under 'TADA' Against Farooq Taklya And Lambu
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.