पवईतील कारवाईत पुण्याच्या तरुणाकडून २५ किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:14 AM2020-09-23T07:14:06+5:302020-09-23T07:14:28+5:30
विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज परिसरालगत सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एक जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या पुण्याच्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने अटक केली. त्याच्याकड़ून २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
चंदाली बशीर अहमद अन्सारी (४५) असे आरोपीचे नाव असून, पवईत ही कारवाई करण्यात आली. पवई परिसरात गांजाच्या तस्करीसाठी एक जण येणार असल्याची माहिती एनसीच्या वांद्रे पथकाला मिळाली. त्यानुसार, त्यांनी सोमवारी सापळा रचून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत ४ लाख २० हजार किमतीचा २१ किलो गांजा सापडला.
विलेपार्लेेतून १४ लाखांचे ड्रग्ज जप्त
विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज परिसरालगत सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एक जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून हेरॉन अशोक राय (३०) याला अटक केली. तो विलेपार्लेतील नेहरू नगरमध्ये राहण्यास आहे. त्याच्याकड़ून १० लाखांचे २५० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले.