खाद्यतेलाची डीलरशिप देतो म्हणून २५ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

By काशिनाथ वाघमारे | Published: October 13, 2023 06:35 PM2023-10-13T18:35:10+5:302023-10-13T18:35:22+5:30

फसवणूक केल्याप्रकरणी गुंजाळ यांनी तिघांवर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

25 lakhs fraud for providing edible oil dealership, case registered against three | खाद्यतेलाची डीलरशिप देतो म्हणून २५ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

खाद्यतेलाची डीलरशिप देतो म्हणून २५ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

सोलापूर : खाद्यतेलाची डीलरशिप देताे म्हणून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अभिषेक गुंजाळ (२४, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सौरभ शर्मा (३४, रा. नवी मुंबई), संजय पाटील (३५, रा. मुंबई) आणि प्रिया जोशी (नोएडा, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्राकडील माहितीनुसार, फिर्यादी गुंजाळ यांच्या खाद्यतेल कंपनीस राज्याची डीलरशिप देतो म्हणून पंचवीस लाख रुपये घेतले. त्याचे बनावट कागदपत्रे तयार करून पाठवून दिले. तसेच गोडावून भाड्याने घेण्यास सांगून त्याचेही भाडे दिले नाही. फसवणूक केल्याप्रकरणी गुंजाळ यांनी तिघांवर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उदार करत आहेत.

Web Title: 25 lakhs fraud for providing edible oil dealership, case registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.