शेतकऱ्याकडून वनरक्षकाने घेतली २५ हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 09:43 PM2020-01-31T21:43:05+5:302020-01-31T21:44:42+5:30

नुकसानभरपाईच्या रकमेपोटी मागितला मोबदला

25 thousand bribe taken by the forest guard from the farmer | शेतकऱ्याकडून वनरक्षकाने घेतली २५ हजारांची लाच

शेतकऱ्याकडून वनरक्षकाने घेतली २५ हजारांची लाच

Next
ठळक मुद्दे महेश नामदेवराव तलमले (४०) असे सदर आरोपीचे नाव असून तो चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत नवेगाव (रै) बिटमध्ये कार्यरत आहे.वनरक्षक महेश तलमले याने सदर रक्कम मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

गडचिरोली : रानडुकराचा हल्ला झाल्यानंतर शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून ती काढून दिल्याचा मोबदला म्हणून एका शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या  वनरक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. महेश नामदेवराव तलमले (४०) असे सदर आरोपीचे नाव असून तो चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत नवेगाव (रै) बिटमध्ये कार्यरत आहे.


प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील शेतकऱ्याची पत्नी काही महिन्यांपूर्वी रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाली होती. वनविभागाने तिच्या उपचारासाठी नुकसानभरपाई म्हणून नियमानुसार १ लाख २५ हजार रुपये मंजूर केले. दरम्यान वनरक्षक महेश तलमले याने सदर रक्कम मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.


संबंधित शेतकऱ्याने या प्रकाराबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार दि.२९ रोजी लाच मागितल्याची एसीबीने पडताळणी केली तर शुक्रवार दि.३१ रोजी सदर रक्कम पंचांसमक्ष शेतशिवारातच स्वीकारताना सदर वनरक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या पो.अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर अधीक्षक राजेश दुधलवार, गडचिरोलीचे उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थुजी धोटे, नायक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबळे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.

Web Title: 25 thousand bribe taken by the forest guard from the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.