पुणे : भारती विद्यापीठात मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे़. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. श्रीकांत बापूराव शिर्के (रा़ अंबक चिंचणी, ता़ कडेपूर, जि़ सांगली) आणि मुकेश मधुकरराव धिवार (रा़. राजस सोसायटी, कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी प्रशांत गोपीनाथ पाटील (वय ४७, रा़. प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली आहे़. पाटील हे प्राध्यापक आहेत़. त्यांची आरोपींशी ओळख होती़ त्यांची मुलगी महिमा हिला एम बी बी एस़ मध्ये प्रवेश मिळवून देता असे सांगून श्रीकांत शिर्के, मुकेश धिवार यांनी त्यांच्याकडून मे २०१६ मध्ये पैसे घेतले होते़. परंतु, त्यावेळी त्यांनी अॅडमिशन मिळवून दिले नाही़. त्यानंतर पाटील यांच्या मेहुण्याचा मुलगा मयुर यास बी ए एम एस करीता भारती विद्यापीठामधील कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून एकूण २८ लाख ८१ हजार घेतले़. परंतु, त्यांना अॅडमिशन मिळवून दिले नाही़. तसेच त्यांनी पैशाची मागणी केल्यावर तेही न दिल्याने शेवटी त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली़.
भारती विद्यापीठात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:53 PM