४ वर्षीय मुलाने शेजाऱ्याच्या घराबाहेर लघवी केली म्हणून आईची हत्या, वाचा काय आहे धक्कादायक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:34 PM2021-08-13T12:34:07+5:302021-08-13T12:35:21+5:30
पोलिसांनी सांगितलं की, ११ ऑगस्ट रोजी रात्री साधारण ११.३० वाजता त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, एका महिलेची अमन विहारच्या ब्लॉक भागात चाकू मारून हत्या करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये ४ वर्षाच्या एक लहान मुलाने शेजाऱ्याच्या घराबाहेर खेळताना लघवी केली होती. याचा शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला इतका राग आला की, त्याने त्या लघवी करणाऱ्या मुलाच्या आई चाकूने हत्या केली. ही घटना रोहिणीच्या अमर विहार भागातील आहे.
पोलिसांनी सांगितलं की, ११ ऑगस्ट रोजी रात्री साधारण ११.३० वाजता त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, एका महिलेची अमन विहारच्या ब्लॉक भागात चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या हत्ये प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मृत महिलेचं नाव सविता राणा उर्फ प्रिय आहे. ३० वर्षीय प्रिया जवळच तिचा पती रोहित आणि ४ वर्षीय मुलासोबत राहत होती. (हे पण वाचा : मॉर्निंग वॉकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू)
पोलिसांनुसार, चौकशीतून समोर आलं की, काही दिवसांपूर्वी सविताच्या ४ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या घरासमोर लघवी केली होती. यावरून त्यांचं भांडण झालं होतं. पण नंतर दोघांचं भांडण एका दुकानदाराने सोडवलं होतं.
११ ऑगस्टच्या रात्री अल्पवयीन पुन्हा एकदा सवितासोबत त्याच मुद्द्यावरून भांडत होता. भांडण चांगलंच वाढलं होतं. यादरम्यान आरोप आहे की, त्याने वस्तरा काढून सविताच्या गळ्यावर वार केले. महिलेवर हल्ला करून अल्पवयीन घटनास्थळावरून पळाला.
पोलिसांनी आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि साक्षीदारांचे जबाब नोदंवल्यावर आरोपीला जवळच्या भागातून अटक केली. पोलीस आरोपीवर पुढील कारवाई करत आहेत.